Monday 5 March 2012

विज्ञान आणि बुद्धिवाद ग्रंथाचे - प्राक्कथन


प्राक्कथन

या  ग्रंथाची पहिली आवृत्ती सन 2000 साली प्रसिद्ध झाली. ती संपून बरेच महिने झाले. पुस्तकाची मागणी सतत होऊ लागल्याने ही दुसरी आवृत्ती काही सुधारणा करून प्रसिद्ध करीत आहे.
बुद्धिवादाची निखळ विज्ञानाच्या निकषांखाली कडक तपासणी करणारा हा मराठीतील पहिलाच ग्रंथ. विज्ञानवादी चोखंदळ महाराष्ट्रीय विचारवंतांच्या पूर्ण पसंतीस तो उतरला याचे समाधान वाटते.  विज्ञानाच्या निकषाखाली बुद्धिवादाच्या मर्यादा उघड करून दाखवणे म्हणजे अंधश्रद्धा पोसणे तर नव्हेच, उलट तो प्रतिष्ठित अंधश्रद्धेवरचाच  हल्ला आहे, ही गोष्ट या ग्रंथामुळे विचारवंतांना पटली आहे हे या ग्रंथाचे खरे यश आहे.
या ग्रंथाला बापुसाहेब ढाकरे कला अकादमी, दानापुर, जि. अकोला यांचा विज्ञान पुरस्कार प्राप्त झाला. ग्रंथाच्या वैज्ञानिक भूमिकेला जाहीर मान्यता मिळाल्याचेच हे चिन्ह आहे.

 - अद्वय़ानंद गळतगे.
या ग्रंथाची प्रस्तावना इथे वाचा