Tuesday 10 July 2012


विज्ञानाच्यादृष्टीकोनातून मरणोत्तर अस्तित्व -  प्रकरण 4

परामानसशास्त्र मरणोत्तर अस्तित्वाचे ही संशोधन करते आणि म्हणून परामानसशास्त्राच्या बुद्धिवादी विरोधकांना ओघानेच नाकारणे भाग पडते.... काही जण मात्र मरणोत्तर अस्तित्व नाकारण्यासाठी अती्ंद्रिय शक्तिचा आधार घेतात. म्हणजे हे लोक अतींद्रिय शक्तीच्या अस्तित्वामुळे मरणोत्तर अस्तित्वाच्या तथाकथित पुराव्याची उपपत्ती लावता येते व त्यामुळे मरणोत्तर अस्तित्व मानण्याची गरज नाही असे म्हणतात, अशा रितीने मरणोत्तर अस्तित्व नाकारण्यासाठी अतींद्रीय शक्तिचे अस्तित्व मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही हे या लोकांना मान्य करावे लागत असल्यामुळे त्यांना बुद्धिवादी म्हणता येत नाही तरीही ते स्वतःला विज्ञानवादी मात्र  म्हणवून घेतात !.... 

....मनाचा उगम भौतिक असेल, तर मेंदूच्या कोणत्यातरी एका भागात जाणिवेचे केंद्र असावे असे मानणे अस्थानी ठरणार नाही पण जाणिवेचे असे केंद्र मेंदूत मज्जाशास्त्रज्ञांना सापडलेले नाही( देकार्त या फ्रेंच तत्ववेत्त्याने  पायनील ग्रंथी हे जाणीवेचे इंद्रिय मानले होते.)... स्वतंत्र स्मरण केंद्र ही मेंदूत सापडलेले नाही....

.... केनेडियन मज्जाशास्त्रज्ञ विल्डर पेनफिल्ड याने तीस वर्षांच्या मेंदूवर संशोधनानंतर पुढील निष्कर्ष काढला आहे - मेंदूतील मज्जापेशीतील प्रक्रियांच्या आधारावर मनाची उपपत्ती लावणे कधीच शक्य होणार नाही. मन हे स्वतंत्र तत्व मानणेच भाग आहे."  -( It will always be impossible to explain the mind on the basis neuronal action within the brain... the mind must be viewed as a basic element in itself"....)
... मन मेंदूहून वेगळे नसल्याबद्दल जे युक्तिवाद (वर) दिले आहेत ते युक्तिवाद करणाऱ्यांना या मेंदूशास्त्रातील शोधांची कल्पना नाही काय? जरूर आहे, पण ते युक्तिवाद करताना एक तर त्या शोधांकडे ते पुर्णपणे दुर्लक्ष करतात किंवा यंत्रवाद खरा ठरवणारे शोध भविष्यात लागतील, अशी आशा बाळगतात. के. आर. पॉपर या विचारवंताने असा प्रकारच्या भौतिकवादी दृष्टीकोणाला Promissory Materialism  (वचन देणारा भौतिकवाद) असे म्हटले आहे. (म्हणजे भविष्यकाळात सिद्ध करू असे वचन देणारा भौतिकवाद. किती वर्षांनी ही वचनपुर्ती ते करणार आहेत हे तेच जाणोत!) खरे तर याला आडमुठा भौतिकवाद हे नाव जास्त शोभेल. कारण शास्त्रीय दृष्टी बाळगणारा मनुष्य आपली आवडती मते बाजूला ठेवून शास्त्रीय पुरावे प्रांजळपणे मान्य करतो. स्वतः पेनफिल्ड हा मज्जाशास्त्रज्ञ आपले शोध लागण्यापुर्वी भौतिकवादीच होता. तसे हे लोक आपला दृष्टीकोण बदलत नाहीत, तकेच नव्हे तर आपल्या भौतिकवादातील अडचणींचा विचार व त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्नही करत नाहीत. यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे परामानस शास्त्रातील शोध होय. या शोधाविषयीही ते वाळूत डोके खुपसताना आढळून येतात....
.... आता अभौतिक मन भौतिक मेंदूपासून व शरीरामार्फत कसे कार्य करते बरे? हा प्रश्न आहे. कार्यकारणभावाच्या नियमाला - एकाच पातळीवर चालणारी ती प्रक्रिया आहे या समजुतीला - त्यामुळे बाधा येत नाही काय?....
.... आता मन अभौतिक असेल तर व मनाला इच्छाशक्तीने शरीराची हालचाल होत असेल तर शक्तीच्या अविनाशित्वाच्या तत्वाला बाधा येत नाही काय?...
... समजा या दोन मितीच्या जगातील प्राण्यांना असे आढळून आले की, त्यांच्या पैकी काहीं व्यक्तींना भविष्यज्ञान होऊ शकते, तर ते आपला दृष्टीकोण बदलतील व भविष्य कालाचे ज्ञान हे अतींद्रिय ज्ञान असूनही अतींद्रिय ज्ञानवस्तू वस्तूतः भविष्यकालात नसून वर्तमान कालातच आहे, पण आपल्या दोन मितीच्या जगातील ती नसून तीन-मितीच्या जगातील वर्तमानकालात आहे, असा सिद्धांत ते मांडतील. हे तीन मितीचे जग जाणण्यासाठी आम्हाला आपले दोन मितीचे जग ओलांडून जावे लागेल म्हणजेच मरावे लागेल, असे ते म्हणतील. म्हणजेच मरणोत्तर तीन मितीच्या जगाच्या अस्तित्वाचा सिद्धांत ते अतीद्रिय भविष्य-ज्ञानाच्या आधारावर मांडतील.

    दोन मितीच्या जगातील प्राण्यांच्या जागी तीन मितीच्या जगातील आम्ही आहोत अशी कल्पना केली व आमच्यातील काही व्यक्तींना भविष्य ज्ञान होऊ शकते असे आम्हाला आढळून आले, तर आम्हाला असाच सिद्धांत मांडावा लागेल. आणि प्रत्यक्षात मनुष्याला भविष्य ज्ञान होऊ शकते, असे प्रयोगांती आढळून आले आहे. आणि त्याच्या आधारावर चार (अगर जास्त) मितीचे मरणोत्तर जग असल्याचा सिद्धांत तात्विकदृष्ट्या आम्हाला स्वीकारावा लागेल. ...

टीप 1 - मरणोत्तर अस्तित्वाची चर्चा पाश्च्यात्य देशात माध्यमांच्या संदर्भात जास्त करण्यात आलेली असून लेखनमर्यादेमुळे ती चर्चा येथे टाळली आहे. मरणोत्तर अस्तित्वाचे वैज्ञानिक दृष्टीकोणातून, संशोधन करण्यासाठी इंग्लंडमधे स्थापन झालेल्या अतींद्रिय विज्ञान संघाचे  (S.P.R.) संस्थापक शास्त्रज्ञ मृत्यु पावल्यानंतर माध्यमांच्यामार्फत त्यांनी आपले मरणोत्त अस्तित्व, सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यासाठी एक आगळे तंत्र त्यांनी अवलंबिले असून ते Cross Correspondence  या नावाने प्रसिद्ध आहे. यात मायर्स हे प्रमुख होते. हॉजसन व गुर्नी यांनीही हा प्रयत्न केला. शास्त्रज्ञांनी Cross Correspondence  चे प्रकरण खोलात जाऊन तपासले, तर त्यांची स्वतः मायर्सच मरणोत्तर जगातून संदेश पाठवत असल्याची खात्री पटल्याशिवाय राहाणार नाही  इतके ते पुरावे निर्देशक (Evidential) आहेत.
गार्डनर मर्फी यांनी मरणोत्तर अस्तित्वाचे तीन निकष ठरवले आहेत. ते निकष म्हणजे स्मरण, व्यक्तिमत्व, आणि सहेतुकता. या तीनही निकषांवर Cross Correspondence चा पुरावा उतरतो. वुइल्यम जेम्स सारख्या काही शास्त्रज्ञांनी अगोदर कोण मरेल त्याने त्याने आपले मरणोत्तर अस्तित दुसऱ्याला सिद्ध करून दाखवायचे असे आपापसात ठरवले व त्यासाठी काही सांकेतिक खुणा ही ठरवल्या. या पद्धतीने जेम्स हिस्लॉपला अगोदर मेलेल्या वुइल्यम जेम्सने आपले मरणोत्तर  अस्तित्व दाखवून दिले. व हिस्लॉपला ते पटलेही. अतींद्रिय शक्ती खोटी म्हणून माध्यमांवर लबाडीचा आरोप व हल्ला आपल्या हयातभर करणाऱ्या हुडिनी या जादुगारानेही आपल्या पत्नीशी असा एक करार केला होता व त्याच्या पत्नीला त्याचे मरणोत्तर अस्तित्व व पटलेही होते.
या शिवाय  इथे वाचा
  • यंत्रवाद युक्तिवादांना उत्तर
  • यंत्रवाद आणि अतीद्रियवाद 
  • नेचर नियतकालिकाने 81साली जाळण्याच्या लायकीचे पुस्तक अशी संभावना केलेल्या शेल्ड्रेक यांच्या A New Scoence of Life लेखनाची सत्यता तपासायसाठी न्यू सायंटिस्ट नियतकालिकाने स्पर्धा आयोजित केली त्यात 1986 साली शेल्ड्रेकचा सिद्धांत बरोबर असल्याचे काही प्रयोगांनी सिद्ध झाले.