Friday, 17 August 2012

लेबॅननच्या इमद एदवारची पुनर्जन्माची केस


विज्ञान आणि बुद्धिवाद - प्रकरण 5 (ब)

     लेबॅननच्या इमद एदवारची पुनर्जन्माची केस


प्रस्तावना

काही ठराविक मुलांनाच आपला पुर्वजन्म का आठवतो याचे संभाव्य उत्तर पुर्वजन्म संशोधनात सापडते. ते असे की ज्यांचा मृत्यु आकस्मिक वा भीषण होतो अशाच व्यक्तींना पुनर्जन्म आठवतो, असे सामान्यपणे आढळून येते. पुर्वजन्माच्या या स्मृतीचे हे वैशिष्ठ्य असून ते व्यास महर्षींना माहित होते असे दिसते. कारण ते म्हणतात, - 
ये मृताः सहसा मर्त्या जायन्ते सहसा पुनः।
तेषां पौराणिको भ्यासः क्वचित कालं हि तिष्ठति।।
तस्माज्जातिस्मरा लोके जायन्ते बोधसंयुक्ताः।
तेषां विवर्धतां संज्ञा स्वप्नवत् प्रणश्यति।।   
महाभारत, अनुशासन 145
अर्थ - जे जबरीने (सहसा) किंवा आकस्मिकपणे मरतात व जे जबरीने वा  आकस्मिकपणे पुन्हा जन्माला येतात, त्यांच्या पुर्वजन्माचा अभ्यास वा संस्कार थोडा वेळ टिकून राहतो. त्यामुळे पुर्व जन्माच्या स्मृती नंतरच्या जन्मात अशा व्यक्तींना येत राहतात व ते त्या आठवणी काही काळ ते सांगत असतात. पण वय वाढेल तसे त्यास्मृती स्वप्नाप्रमाणे नष्ट होतात. (ते त्या हळूहळू विसरतात)
पुढे व्यास महर्षी हेही सांगायला विसरत नाहीत की,

परलोकस्य चास्तित्वे मूढानां कारणं त्विदम्।। 

अर्थ - जे लोक परलोकाचे अस्तित्व मानत नाहीत अशा मुर्ख (मूढ) लोकांचा पुर्वजन्मावर विश्वास बसण्याकरता अशा घटना कारणीभूत होतात.
पुर्व जन्माच्या आठवणी सांगणारी लहान मुले(2-4 वर्षांची) नसती तर हे नास्तिक लोक  पुनर्जन्म  व परलोक मानले नसते असे यावरून ठरते. पण पुर्वजन्माच्या स्मृती सांगणारी मुले असूनही व त्याच्य़ा स्मृती खोट्या नाहीत हे वस्तुनिष्ठ निकषांवर सिद्ध होऊनही पुनर्जन्म नाकारणारे हल्ली लोक आहेत  याला काय म्हणावे?...
...या लोकांचा असला दुटप्पीपणाचा व्यवहार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा एखाद्याच्या शक्तिचा आणि वेळेचा अपव्यय आहे. असे असताना दुटप्पीपणा आणि खोटेपणा चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न मला करावा लागत आहे. तो करण्यापुर्वी तो का करावा लागत आहे, हे सांगितले पाहिजे...

पुनर्जन्म सिद्धांतविषयीचे स्टिव्हन्सन यांना शास्त्रीय आव्हान

लिओनार्ड एंजल
... अशा बुद्धिवाद्यांच्या कंपूपैकी लिओनार्ड एंजल या नावाचे एक लेखक असून त्यांनी स्टीव्हन्सन यांच्या पुनर्जन्म दाव्यांचा ( व पुनर्जन्माचा ) कसा भांडाफोड केला आहे हे दाखवून देणारा एक लेख सांगलीहून प्रसिद्ध होणाऱ्या अंनि वार्तापत्राच्या जानेवारी 1997 च्या अंकात संपादक डॉ प्रदीप पाटील यांनी लिहिला व तो अंक माझ्या पत्त्यावर पाठवला. शास्त्रीय दखल घेण्याची योग्यता नसतानाही या लेखाची मी एवढ्यासाठी दखल घेत आहे की वाचकांना पाश्चात्य बुद्धिवाद्यांच्या खोटेपणाचा नमुना पाहावयाला मिळावा. या लेखाची दखल घेताना मी त्यांना पत्र पाठवले आणि म्हटले, अंधश्रद्धानिर्मूलन याचा अर्थ असत्य गोष्टींवरील श्रद्धा असा असेल तर मी ही अंधश्रद्धानिर्मूलनवादीच आहे. आणि पुनर्जन्माविषयीचे सत्य पुढे यावे या उद्देशानेच मी तो लेख लिहिला आहे. या लेखाला उत्तर म्हणून आपण त्याच उद्धेशाने आपल्या वार्तापत्रात लेख लिहिला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण मग त्या लेखाला त्याच उद्धेशाने प्रत्युत्तर देणे जरून आहे. कारण आपला लेख पुर्णपणे सत्याचा विपर्यास करणारा आहे. माझ्या लेखात सत्यनिष्ठा, संयम व प्रतिपक्षाबद्दल आदर या गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातील याची खात्री बाळगावी. आपण माझा लेख छापायला तयार नसाल तर आपला (व आपल्या समितीचा) उद्धेश सत्यसंशोधन नसून दुसराच काही आहे असे मानायला मी मोकळा असेन. कळावे. 
आपला उत्तराभिलाषी, अवयानंद गळतगे
  
           इमद एदवार
             मध्य पुर्वेत लेबॅनन देशातील कोर्नेल या गावी एलवार कुटुंबात 1958 साली इमदचा जन्म झाला. तो दीड वर्षाचा झाल्यावर आपण ख्रिबी नावाच्या (25 किमी अंतरावर)एका खेड्यात बौहामजी नावाच्या कुटुंबात पुर्वजन्मी होतो असे सांगू लागला. तो जमीला नावायच्या बाईची आठवण वरचेवर काढत असे. इतरही लोकांची नावे तो सांगत असे. एका ट्रकच्या अपघाताविषयीही तो बोलत असे. अशा प्रकारे व्यक्ती व घटना याविषयीची इमदने केलेली 73 विधाने स्टिव्हन्सन यांनी आपल्या पुस्तकाच्या या प्रकरणच्या तक्त्यात दिली आहेत.... विधाने उत्स्फूर्त आहेत. पैकी काही मोघम स्वरूपाची विधाने होती. त्या विषयी पालकांनी स्वतःचा काही तर्क लढविला आणि तेथेच घोटाळा झाला. कारण स्टिव्हन्सन यांची दिशाभूल झाली. या प्रारंभिक दिशाभुलीमुळेच हे प्रकरण पुनर्जन्माचा भांडाफोड करण्यासाठी एंजल यांच्या उपयोगी पडले. स्टिव्हन्सन ख्रिबी या गावी गेल्यावर तपासाअंती कळून आले. की ... त्या व्यक्ती व सर्व घटना प्रत्यक्षात होत्या. फक्त त्या व्यक्तिंचा व घटनांचा परस्पर संबंध कसा जुळवायचा हे पालकांना कळले नव्हते किंवा जमले नव्हते. (पण) म्हणून ते प्रामाणिक असल्याचे त्यांच्या चुकाच सिद्ध करत होत्या. ... 
 पुर्ण माहिती वाचकांनी पान क्र.103 वर वाचावी.
•             भांडफोडीचे सहा मुद्दे
एंजल यानी जी केस टीकेला निवडली आहे ती इतकी मोठी आहे की (मूळ स्टिव्हन्सनांच्या ग्रंथाची 50 पृष्ठे तिने व्यापली आहेत.) त्यातील ज्या सहा मुद्यांखाली या प्रकरणाचा भांडाफोड केल्याचा संपादक दावा करतात, त्यातील प्रथम चार मुद्यांचा विस्तारभयास्तव फक्त उल्लेख व अन्य दोनाचा उत्तरासह विचार –     
 मुद्दा क्र 1 : तपासणीपुर्वी आठवणी कशा जमा केल्या? याची पद्धती सांगण्यात आलेली नाही. 57 आठवणी नोंदवण्याची पद्धती दिली नाही.
मुद्दा क्र. 2:  महमूद असे नाव इमदने घेतले. स्टिव्हन्सन स्वतःच असे लिहितात की महमूद बौहमजी हे इब्रहिम बौहमजीचे काका होते. पण हे ते केंव्हा म्हणतात? तर जेंव्हा ख्रिबी या गावी चौकशी केल्यावर तसे आढळते तेंव्हा!
 मुद्दा क्र. 3: इमदच्या म्हणण्याप्रमाणे त्याचे नाव बौहामजी होते. तो ख्रिबी या गावी राहात असे. पण  गोष्टीची स्टिव्हन्सन यांनी शहानिशा कधी व कशी केली? त्या गावातील लोकांना भेटून.  पुर्वीच्या महमूदच्या मित्रांना भेटून की इमद यांच्या पैका साऱ्यांना भेटल्यावर? तो म्हणतो म्हणून तो त्या गावचा असेल असे संशोधन कुचकामी असते. बौहमजी या आडनावाबद्दलही असेच म्हणता येईल.
मुद्दा क्र. 4: इमदच्या पुर्वायुष्यातील घरात दोन विहिरी होत्या एक भरलेली व एक कोरडी याचा अर्थ स्टिव्हन्सन यांनी स्वतःच्या पद्धतीने काढून हास्यास्पद अर्थ दिला आहे. ते लिहितात, ‘त्या घरात 2 हंडे होते’. म्हणजे पाच वर्षाच्या मुलाला विहीर व हंडे यातील फरक कळत नाही?
 मुद्दा क्र. 5 इब्राहिम बौहामजीच्या भावाची -  हफीजची भेट स्टिव्हन्सन यांनी घेतली आणि हफिजने जे जे सांगितले ते सर्व इमदच्या म्हणण्याशी विसंगती दाखवणारे निघाले. उदा. इमद म्हणतो मी अपघातात मेलो. पण हफीजने सांगितले इब्राहिम हा मणक्याच्या टीबीने मेला. असे 28 मुद्दे विसंगतीचे आढळले आहेत. आता बोला!’ –(इति संपादक)

उत्तर - इमदने ट्रकच्या अपघातात मेलो असे कधीच म्हटलेले नाही. तो पालकांचा चुकीचा समज होता (हे वर सांगितलेच आहे) अशा रीतीने एंजल विसंगतीचे उदाहरण म्हणून जो मुद्दा मांडतात तोच बुद्धिपुरस्सर धादांत खोटा मुद्दा मांडतात. तेंव्हा एकतर (न सांगितलेले )28 मुद्दे खोटे आहेत हे वेगळे सांगायची जरूर नाही. असे संपादक पाटील म्हणतात, ‘आता बोला’, आम्ही म्हणतो, ‘हे 28 मुद्दे बोला. त्यांनाही उत्तर देऊ.पण ते बोलणार नाहीत कारण ते अस्तित्वातच नाहीत! 

मुद्दा क्र. 6 - बौहमजी हे नाव इमदने पुर्वी ऐकले होते काय? एंजल यांनी स्वतंत्र छाननीकेली तेंव्हा उत्तर मिळाले (होय!) 

उत्तर – ‘स्वतंत्र छाननीहा धूर्त व कावेबाज शब्दप्रयोग आहे. याचा अर्थ खोटा आरोप असा आहे. इमदचे वडील एकदा ख्रिबीला गेले होते (बौहमजी आडनावाच्या अंत्यसंस्कारासाठी) पण ते ख्रिबीला केंव्हा गेले? तर 1963 साली! पण इमद त्याच्या 3 वर्षांपासून म्हणजे 1960 सालापासून बौहामजी हे नाव सांगत होता. त्यावेळी त्यांच्या पालकांना बौहामजी हे नाव माहितही नव्हते. आणि स्टिव्हन्सनना हे स्वतः पालकांनीच सांगितले आहे. (इस्लाम धर्मात अनोळखी लोकांच्या सुद्धा अंत्यसंस्कारला आमंत्रणावरून जाण्याची प्रथा आहे)
            इमदने सांगितलेल्या 57 आठवणी व 16 ओळखी
असा 73 विधानांवरून ख्रिबी या गावी जाऊन त्यांची शहानिशा केल्यानंतर प्रत्यक्ष जे आढळले त्यावरून स्टिव्हन्सननी इमदच्या पुनर्जन्माचा निष्कर्ष काढला आाहे. 57 आठवणींपैकी 51 आठवणी बरोबर आढळून आल्या. (चुकलेल्या 6 आठवणींपैकी 3 आठवणी का चुकल्या याची स्टिव्हन्सननी समर्पक उपपत्ती दिली आहे. याशिवाय मोठी सुशिक्षित माणसे सुद्धा विसरतात, चुकीचे आठवतात हे सर्वसामान्यआहे.) पुर्वजन्मातील 51 आठवणी व 16 गोष्टी इमदने बरोबर कशा सांगितल्या याची उपपत्ती एंजल जवळ आहे काय? (यासर्व गोष्टींचा उल्लेख एंजल पद्धतशीरपणे टाळतात!) 
ओक यांचे पुर्व जन्म  - संकल्पनेवरील निवेदन -  आधीच्या जन्मातील व्यक्तीच्या शरीरातील काही स्मृती व अभ्यास (एखाद्या कलेचे -विषयाचे प्राविण्य) त्याचे शरीर भौतिकरित्या नष्ट झाले तरी आसमंतात अस्तित्वात असते. सामान्यपणे त्याला वासना असे नाव देतात. त्यांना योग्य वाहन मिळणारे शरीर मिळाले की त्या मधून त्या प्रकट होतात. कधी त्या काहीकाळ टिकतात वा कधी त्या (अभ्यासाच्या रुपात) जन्मभर विनाप्रयास उपलब्ध होतात. नंतरच्या व्यक्तीत शरीराने त्या आधीच्या व्यक्तीशी संबंध दर्शवण्यासाठी 'पुनर्जन्म' अशी संकल्पना प्रस्थापित होते. स्टिव्हन्सन ही म्हणतात की या व्यवस्थेला अन्य नाव देता येत नाही म्हणून त्याला आधीच्या व्यक्तीचा पुनर्जन्म असे सध्या म्हणावे लागते. शरीर व मन किंवा वासना या दोन वेगवेगळ्या आहेत. रिग्रेशन  वा मृतात्म्यांशी संपर्कातून वा संकल्पनेतून ही वासनारुपी आधीच्या व्यक्तीशी आपण संपर्क करू शकतो.  त्या व्यक्ती वासनेच्या आवरणामुळे आपण देहधारी आहेत असे मानून उत्तरे देतात किंवा वागतात. प्रश्न असा की अशी मनाची देहातीत वासना असते का? तिला आसमंतात योग्य वाहक शरीराची वाट पहायची व्यवस्था अस्तित्वात आहे का? असेल तर ती कशी? "परलोक" असे महाभारतात व्यासांनी म्हटले आहे, तो एक योग्य वाहक शरीराची वाट पहाण्यासाठीचा एक थांबा मानावा काय़?  यावर शोधकार्य करायला या केसेसचा अभ्यास करून काही साधते का? याचा पडताळा भौतिक शास्त्रानुसार यायला वा घ्यायला हवा आहे. तो तसा मिळत नाही असे आत्तापर्यंतचे अनुभवाचे फलित आहे. परंतु त्याचे उत्तर शोधायचे की "तसे काही नसतेच" असे मानून दुर्लक्ष करायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे....  

Friday, 3 August 2012

विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पुनर्जन्म सिद्धांत प्रकरण 5 (अ)


 विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पुनर्जन्म सिद्धांत प्रकरण 5 (अ)
या संबंधी वर्तमानपत्रातून आलेल्या काही बातम्या -
 • पुर्वजन्म सांगणारा गणेश चुरी 
 • रंजना गुप्ता आणि मनदीप कौर 
 • मालती शंकर 
 • पुर्वीची सुमित्रा ठाकूर आताची शिवा

जग प्रसिद्ध शांती देवी माथुर प्रकरण

दिल्लीच्या श्री. रंगबहादुर माथुरांची ही मुलगी 11 डिसेंबर 1926 ला जन्मली. ती मथुरेच्या पंडित केदारनाथ चौबेंची पत्नी आहे असे सांगत असे.
... या प्रकरणात म. गांधींनी इतका रस घेतला की शांतीदेवीला आपल्या आश्रमात बोलावून खास भेट घेतली  नंतर त्यांच्या सल्यानुसार 15 जणांची कमिटी स्थापुन तिला आपल्या बरोबर मथुरेला - पुर्वजन्मातील गावातील तिच्या घरच्यांना भेटायला तिच्या वडिलांचे मन वळवून पाठवणी केली ....
.... प्रस्तुत लेखकाचे (प्राचार्य अद्वयानंद गळतगे. गळतगे) स्नेही प्रा.कीर्तीस्वरूप रावत शांती देवीला तिच्या मृत्युअगोदर 23 डिसेंबर 87ला चार दिवस भेटले होते. तेंव्हा तिने पुर्वी घडलेले अगदी खरे होते असे सांगितले होते....

पुनर्जन्म सिद्धातावरील शास्त्रीय आक्षेप

काही टीकाकार व संशयवाद्यांनी आक्षेप घेतले त्यावर स्टिव्हन्सन म्हणतात, त्यांचे काही आक्षेप मान्य आहेत पण ते पुनर्जन्म खोटे ठरवत नाहीत. ते आक्षेप (व उत्तरे ब्लॉगवर वाचावीत) असे –
 • फसवणूक 
 • अतिशयोक्ती 
 • सामान्यपणे दडलेल्या स्मृती 
 • अतींद्रिय शक्तीचे ज्ञान  
 • अनुवंशिक स्मृती 
 • झपाटणे वा परकाया प्रवेश 

  पुनर्जन्माची इतर काही लक्षणे –  

 • लिंगांतर 
 • अपघाती मृत्यू 
 • भाकिते वा सूचक स्वप्ने 
 • जन्मखुणा 
 • दोन जन्मातील अंतर 
 • दोन जन्मातील अवस्था

समारोप –

पुनर्जन्माचे शास्त्रीय संशोधन कसे करावे या विषयावर मार्गदर्शन करणारे अलाहाबादचे डॉ. जमुना प्रसाद यांचे पुस्तक New Dimensions in ReincarnationResearch आहे.

डॉ जमुनाप्रसाद कुमकुमची केस सोडवताना डावीकडून पहिले

पुनर्जन्मावर शोधकार्य करणारे स्व. डॉ. आयन स्टिव्हन्सन

पुनर्जन्मावर शोधकार्य करणारे  स्व. डॉ. आयन स्टिव्हन्सन

डॉ. आयन स्टिव्हन्सन
स्व. डॉ. स्टीव्हन्सन यांचे पुनर्जन्मावरील संशोधन ग्रंथ फार मोठे आणि सहज उपबलब्ध होण्यासारखे नाहीत. उपलब्ध झाले तरी ते वाचण्याची तसदी सहसा कोणी घेत नाही. हे माहित असल्यामुळे बुद्धिवादी लोक या प्रकरणांविषयी व सिद्धांताविषयी धडधडीत खोटे लिहिण्याचे धाडस करीत असतात. म्हणूनच हे ग्रंथ मुळात वाचण्याची शिफारस केला आहे. त्यामुळे हे लोक खोटे लिहायला किती निर्ढावलेले आहेत याची कल्पना येईल.

Page vii - No other doctrine has exerted so extensive, controlling, and permanent an influence upon mankind as that of the metempsychosis, — the notion that when the soul leaves the body it is born anew in another body, its rank, character, circumstances, and experience in each successive existence depending on its qualities, deeds, and attainments in its preceding lives......


 
पुनर्जन्म सिद्धांतविषयीचे स्टिव्हन्सन यांचे शास्त्रीय आव्हान प्रकरण 5 मधील संदर्भात

माझा (प्रा. गळतगे यांचा) पुनर्जन्मावरील लेख प्रकरण 6 अबकडईच्या 1996 सालच्या दिवाळी अंकात प्रथम प्रसिद्ध झाला. त्या लेखात आयन स्टिव्हन्सन पुनर्जन्म संशोधकाच्या "Twenty Cases Suggestive of Reincarnation" या ग्रंथाचा उल्लेख केला असून पुनर्जन्म सिद्धांत शास्त्रीय पायावर प्रस्थापित करायचे श्रेय मी त्या लेखात त्यानाच प्रामुख्याने दिले आहे.
त्यांनी सुमारे 2500 पुनर्जन्म प्रकरणांचा जगभर फिरून अत्यंत कसोशीने शास्त्रीय निकषांखाली अभ्यास केला आहे. अभ्यास करताना त्यांनी त्या त्या देशातील संबंधित कुटुंबांना अनेकदा भेटी देऊन त्या प्रकरणांचा शास्त्रीय दृष्टीने पाठपुरावाही केला आहे. त्यांचे संशोधन असा प्रकरणाचा शास्त्रीय निकषांखाली कसा अभ्यास करावा याचा वस्तुपाठच आहे. असे म्हणता येईल. त्यांच्या या शास्त्रीय संशोधनात कसलीही उणीव आजतागायत कोणालाही मान्यवर शास्त्रज्ञाने दाखवून दिलेली नाही. The Journal of Nervous and Mental Diseases या गंभीर वैज्ञानिक संशोधनपर लेख प्रसिद्ध करणाऱ्या नियतकालिकाने स्टिव्हन्सनचा पुनर्जन्मावरील लेख प्रसिद्ध करून पुनर्जन्म संशोधन हे शुद्ध वैज्ञानिक असल्याचे मान्य केले आहे. (मे 1977चा अंकात) डॉ. हेरॉल्ड लायेफ् यांनी त्याच नियतकालिकात स्टिव्हन्सन ना विसाव्या शतकातील गॅललिओ म्हटले आहे. त्यामुळे पुनर्जन्म खोटा म्हणणाऱ्यांना त्यांचे संशोधन हे एक मोठे आव्हान ठरले आहे. या आव्हानाला बुद्धिवादी तोंड देऊ शकत नाहीत असे होऊ नये म्हणून (काऱण तसे झाले तर बुद्धिवादी तत्वज्ञान निकालात निघते) पाश्चात्य बुद्धिवादी व नास्तिकवादी पुढे सरसावले व त्यांनी सामान्य लोकांचा - जे स्टिव्हन्सन यांचे संशोधनात्मक ग्रंथ वाचू शकत नाहीत - बुद्धिभेद करण्यास प्रारंभ केला.
या बुद्धिवाद्यांनी खोट्या युक्तीवादाच्या व विधानांच्या आधारे आपली प्रणाली दामटण्यासाठी नियतकालिके चालवली आहेत. काही ग्रंथ ही लिहिले आहेत. पाश्चात्य बुद्धिवाद्यांमधे मार्टीन गार्डनर (विज्ञान विषयक लेखक), जेम्स रँडी (जादुगार) व पॉल कुर्ट्झ(मनसाज्ञ) आहेत. त्यांनी अमेरिकेत अतींद्रिय घटनांचे सत्यत्व प्रस्थापित करणाऱ्या शास्त्रज्ञांचा भांडाफोड (Debunking)करण्यासाठी एक कमिटी स्थापली असून तिचे नाव (कमिटी फॉर दि इन्व्हेस्टिगेशन ऑफ दि क्लेम्स ऑफ दि पॅरानॉर्मल) असे ठेवले आहे. या कमिटीचा उद्योग अतींद्रिय दावे खोटे ठरवण्यासाठी बिनदिक्कतपणे खोटे लिहिणे व खोटे युक्तिवाद करणे  याशिवाय दुसरा काही नसतो. शास्त्रीयतेच्या बुरख्याखाली हे सर्व केले जाते.  हा या कमिटीचा विशेष आहे. यासाठी वाममार्गाचा सुद्धा वापर केला जातो. या विषयी गार्डनरचेच उदाहरण देता येईल...(पान क्र.100 वाचा)
डॉ स्टिव्हन्सन यांची रिलक्टंट मेसेंजर मधील मुलाखत व परिचय वाचा. 

 
 
 
2 टॉम श्रोडर