विज्ञान आणि बुद्धिवाद - पुरस्कार
केवळ बुद्धिप्रामाण्यवादाने संपूर्ण सत्याशोधन होणार नाही, बुद्धिला सम्यक श्रद्धेची जोड मिळाली तरच विश्वातील अनेक रहस्यांची उकल होईल. अंतः स्फूर्तीने झालेल्या रहस्योद्घाटनेच्या व्यावहारिक प्रस्थापनेसाठी दीर्घकालीन वैज्ञानिक साधनेची जोड अपरिहार्य असते हे या ग्रंथाचे तात्पर्य आहे.
आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी योग साधना आणि अंतःस्फूर्ती या द्वारा विश्वातील अनेक रहस्यांचे ऊद्घाटन केले. किंबहुना, आपला सनातन धर्म सिद्धांत ही अशा ऋषींच्या सत्यदर्शनावरच आधारित आहेत. अतींद्रिय शक्तीचे अस्तित्व, मरणोत्तर अस्तित्व, पुनर्जन्म इ. विषयक सिद्धांत हे अशा अशा काही मूलभूत सिद्धांतापैकीच आहेत. आजच्या काळातही अशा सिद्धांताची सत्यता प्रतिपादन करणारे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध होत आहेत. अशा काही पुराव्यांचे संकलन आणि विश्लेषण श्री. गळतगे यांनी आपल्या या पुस्तकात केले आहे.
विचारवंतानी स्वमतांधता सोडून देऊन सत्श्रद्धा कोणत्या आणि अंधश्रद्धा कोणत्या याचा विवेकाने शोध घेणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment